विज्ञान शिक्षण सोपे, रंजक आणि कृतीप्रधान व्हावे यासाठी हेमंत लागवणकर गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजी आणि मराठी भाषेतून मल्टिमिडीया शैक्षणिक साहित्य विकसित करत आहेत. या साहित्यामध्ये विज्ञान प्रयोग, कृती, इयत्ता ६ वी ते १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ऍनिमेटेड धडे, तसेच प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. हे शैक्षणिक साहित्य सुरुवातीला मल्टिमिडीया सीडीच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आले होते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सीडीचा वापर कालबाह्य झाल्याने हे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावे यासाठी वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले. ऍनिमेशन, व्हिडिओ क्लिप्स, प्रात्यक्षिके, विज्ञान संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण यांचा समावेश असलेले हे समृद्ध दृक-श्राव्य शैक्षणिक साहित्य आता वेब पोर्टलद्वारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमी यांना विज्ञान अधिक दृश्यात्मक, अनुभवाधारित आणि संकल्पनात्मक पद्धतीने समजण्यासाठी हे साहित्य अत्यंत उपयुक्त असून यामुळे विज्ञान शिकणे अधिक सोपे, प्रभावी आणि आनंददायी बनते.
विज्ञान प्रयोग, कृती व उपक्रमांसाठी ई-लर्निंग साहित्य
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
जस्ट डू इट
शालेय अभ्यासक्रमात असलेल्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना प्रयोग, कृती आणि उपक्रमांच्या माध्यमांतून या सीडीमध्ये सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केल्या आहेत. या ई-लर्निंग साहित्याच्या मदतीने विविध वैज्ञानिक संकल्पनांमागचे विज्ञान आणि त्यांचे व्यवहारातील उपयोजन समजून घेता येते.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिडिओच्या मदतीने सादर केलेले एकूण ७६ प्रयोग
शालेय अभ्यासक्रमावर आधारित ई-लर्निंग साहित्य
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
सोपे करू विज्ञान
इयत्ता ६ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेले ई-लर्निंग मल्टीमिडीया साहित्य. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्टसच्या मदतीने सादर केलेले १२४ पाठ्यघटक
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
चला शिकू विज्ञान
इयत्ता ७ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेले ई-लर्निंग मल्टीमिडीया साहित्य. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्टसच्या मदतीने सादर केलेले १५४ पाठ्यघटक
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
समजून घेऊ विज्ञान
इयत्ता ८ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेले ई-लर्निंग मल्टीमिडीया साहित्य. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने सादर केलेले १५३ पाठ्यघटक
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात
इयत्ता ९ वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेले ई-लर्निंग मल्टीमिडीया साहित्य. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्यामदतीने सादर केलेले १९९ पाठ्यघटक
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
विज्ञान संकल्पना
इयत्ता १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम सोप्या भाषेत आणि एनिमेशन, व्हिडियो क्लिप्स आणि निवेदन यांच्या मदतीने शिकण्यासाठी तयार केलेले ई-लर्निंग मल्टीमिडीया साहित्य. विज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी, अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी, विज्ञानातल्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
ऍनिमेशन आणि ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने सादर केलेले २०६ पाठ्यघटक(भाग १ व भाग २ सह)
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके (इयत्ता ९ वी साठी)
इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे व्हिडीओ यामध्ये समाविष्ट केले आहेत. हे प्रयोग कसे करावेत, निरीक्षणे कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन. प्रत्येक प्रयोगामागचे विज्ञान काय आहे हे यामध्ये समजावून दिले असून प्रत्येक प्रयोगावर आधारित प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश आहे.
भाग १ व भाग २ मधील एकूण २८ प्रयोगांचे व्हिडिओ
मराठी व इंग्रजी या भाषांमधून उपलब्ध
विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके (इयत्ता १० वी साठी)
इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे व्हिडिओ यामध्ये समाविष्ट केले आहेत. हे प्रयोग कसे करावेत, निरीक्षणे कशी घ्यावीत याचे मार्गदर्शन. प्रत्येक प्रयोगामागचे विज्ञान काय आहे हे यामध्ये समजावून दिले असून प्रत्येक प्रयोगावर आधारित प्रश्नोत्तरांचा यामध्ये समावेश आहे.